Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: गोणपाटात आढळले महिलेची साडी, बांगड्या अन्‌ हाडांचा सांगाडा

गोणपाटात आढळले महिलेची साडी, बांगड्या अन्‌ हाडांचा सांगाडा

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : कन्नड घाटामध्ये बोढरे शिवारामध्ये एका महिलेच्‍या मृतदेहाचा हाडाचा सांगाडा (Crime News) आढळून आला. यासंदर्भात वनपाल दीपक किशन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर काटेरी झुडपात एका गोणपाटात मृतदेहाचे हाडे आढळून आले. एका अज्ञाताने महिलेचा खून करून मृतदेह आणून फेकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करीत हाडाचा सांगाडा जप्त केला आहे.

दोन महिन्‍यांपुर्वी हत्‍येची शक्‍यता

गोणपाटात हाडे, केस, कवटी, महिलेची साडी, ब्लाऊज परकर तसेच बांगड्या असे आढळून आले आहे. पोलिसांच्‍या माहितीनुसार दोन ते तीन महिन्यांपूर्वी महिलेची हत्या करुन मृतदेह गोणपाटात भरुन विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

SCROLL FOR NEXT