Chalisgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत दोघा मित्रांचा मृत्यू; चाळीसगाव- धुळे महामार्गावर अपघात

Jalgaon News : सासरवाडीला जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. यावेळी भोरस गायरान शिवाराजवळ त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक

Rajesh Sonwane

मेहुणबारे (जळगाव) : दोन मित्र दुचाकीने जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात चाळीसगाव- धुळे महामार्गावरील भोरस गायरान शिवारात घडला. 

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील चिंचगव्हाण येथील विलास छगन बागूल (वय ४४) व अंकुश काशिनाथ गायकवाड (वय ३५) या दोघांचा घटनेत मृत्यू झाला आहे. विलास बागुल हा मित्राला घेऊन तळोंदे प्र. चा. सांगवी (ता. चाळीसगाव) येथे सासरवाडीला जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. यावेळी भोरस गायरान शिवाराजवळ त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार (Accident) धडक दिली. 

धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच (Death) मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक पळून गेला. याप्रकरणी मुरलीधर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार विजय शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस सरकारचे ५ मास्टरस्ट्रोक! शेतकरी, म्हाडा रहिवासी ते कृषी विभागासाठी मोठे निर्णय, वाचा A टू Z माहिती

Coconut Oil for Cooking: महिनाभर नारळाच्या तेलामध्ये अन्नपदार्थ बनवा, शरीरात 5 मोठे बदल झालेले दिसतील

लालबागच्या राजाच्या दरबारात धक्कादायक प्रकार! अभिनेत्रीने दान केलेले पैसे कार्यकर्त्यानेच पळवले; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात दुष्काळ निवारणासाठी देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT