Bodwad News Saam tv
महाराष्ट्र

Bodwad News : लोखंडी क्रेन अंगावर पडून तरुणाचा मृत्यू; स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना घडली दुर्दैवी घटना

Jalgaon News : कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण करण्यासाठी घरी जात होता. यावेळी घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते.

साम टिव्ही ब्युरो

बोदवड (जळगाव) : बोदवड शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकताना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना (Bodwad) बोदवड येथे २४ डिसेंबरला घडली.  (Breaking Marathi News)

प्रकाश नारायण पालवे (वय ३७, राहणार वंजारी वाडा) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. प्रकाश पालवे याच्या घरची (Jalgaon News) परिस्थिती हलाकीची आहे. दरम्यान तो कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण करण्यासाठी घरी जात होता. यावेळी घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते. स्लॅब टाकण्याचे काम क्रेन मशीनने सुरू होते. यावेळी प्रकाश हा घरी जेवणाला जात असताना लोखंडी क्रेनचा छावडा अचानक त्याच्या अंगावर तुटून पडला. यात त्याचा मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेवणासाठी वाट पाहत होती पत्नी 

गावातच काम असल्याने दुपारी जेवण करण्यासाठी येणार असल्याचे सांगून प्रकाश गेला होता. यामुळे पत्नी घरी जेवणासाठी वाट पाहत होती. परंतु घरी जेवणाला जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश याच्या पक्षात पत्नी व लहान मुलगी आहे. याप्रकरणी विजय भगवान वंजारी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रवींद्र गुरसळ करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT