बोदवड (जळगाव) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाजारपेठेत रहदारीच्या रस्त्यालगत असलेल्या (Jalgaon News) विहिरीत बुडून ३६ वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. नीलेश सुभाष माळी असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)
विहिरीशेजारी असलेल्या नाश्ताच्या गाडीजवळ नीलेश याने नास्ता करून बाजूलाच असलेल्या विहिरीत रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान उडी मारून जीवनयात्रा संपवली. दरम्यान, वर्षभरापूर्वी नीलेश माळी यांच्या पत्नीने मुलबाळ होत नाही, या कारणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे नीलेश माळी यांच्यावर सासरकडील मंडळींनी मृत्यूस कारणीभूत धरून त्यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल केला होता.
पत्नीच्या मृत्यूच्या विरहातून आत्महत्या
त्यानंतर नीलेश माळी हे जामिनावर बाहेर होते. सतत पत्नीच्या मृत्यूचे शल्य बाळगून नीलेश माळी यांनी आत्महत्या केली, अशी चर्चा शहरात पसरली आहे. मृत नीलेशचे काका प्रकाश माळी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी रवींद्र गुळचळ तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.