Jalgaon Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal : नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या मामा- भाच्याचा मृत्यू; अंघोळीसाठी नदीवर गेले असताना घडली घटना

Jalgaon Bhusawal News : दोघेजण सकाळी भुसावळ शहरातील राहुलनगर भागातील देवीच्या मंदिर परिसरातील तापी नदीत अंघोळीसाठी गेले होते. अंघोळीसाठी नदीत उतरले दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : नातेवाईकांकडे देवाचा कार्यक्रम असल्याने जालना येथून भुसावळ शहरात आलेल्या मामा- भाच्याचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची घटना भुसावळ येथे घडली आहे. शहरापासून जवळच असलेल्या तापी नदीवर दोघेजण अंघोळ करण्यासाठी गेले. मात्र नदीत बुडून दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी दुःखाचा डोंगर पसरला आहे. 

जालना येथील रामराजे नंदलाल नातेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) असे तापी नदीत बुडून मृत्यू झालेल्या मामा भाच्यांची नावे आहेत. रामराजे व आर्यन हे दोघेजण हातमजुरी करून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. दरम्यान, भुसावळ शहरातील पेंढारवाडा भागात रहिवासी असलेले त्यांचे नातेवाईक संदीप रणधीर यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने ते जालना शहरातून भुसावळ येथे आले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले 

दरम्यान, २१ मे रोजी रामराजे नातेकर व त्यांचा भाचा आर्यन काळे हे दोघेजण सकाळी भुसावळ शहरातील राहुलनगर भागातील देवीच्या मंदिर परिसरातील तापी नदीत अंघोळीसाठी गेले होते. अंघोळीसाठी नदीत उतरल्यानंतर दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. पाण्याची खोली अधिक असल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत दोघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटना घडल्यानंतर कार्यक्रम असलेल्या रणधीर यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटने प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी

Kidney Health: किडन्या खराब होऊ नयेत म्हणून आत्ताच जीवनशैलीत करा हे 7 बदल

Khana Saree Design: लग्नात नेसण्यासाठी पाहा या 7 ट्रेंडी आणि बजेटमध्ये असलेले सुंदर खणाच्या साड्या

Night Sweating Causes: रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम का येतो?

Couple Ring Designs : 'कपल रिंग'च्या आकर्षक डिझाइन्स, तुमचा रोमँटिक अंदाज पाहून बायको होईल खुश

SCROLL FOR NEXT