Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News : फुटबॉल कोचिंग करून परतताच मृत्यूने गाठले; स्विच बंद करताना विजेचा जोरदार झटका

Jalgaon News : १६ ऑक्टोम्बरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सिद्धार्थ पवार हे आरपीएफ बँरेकमध्ये फुटबॉल कोचिंग करीत होते.

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : आरपीएफ बँरेकमध्ये फुटबॉल कोचिंग करून झाल्यानंतर तेथील स्वीच बंद करायला गेले. यावेळी त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात फुटबॉल कोचचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळमध्ये घडली. 

भुसावळ (Bhusawal) शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीतील सिद्धार्थ अनिल पवार (वय ३५) असे सदरच्या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना १६ ऑक्टोम्बरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सिद्धार्थ पवार हे आरपीएफ बँरेकमध्ये फुटबॉल कोचिंग करीत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी कोचिंग केल्यानंतर ते जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी तेथील स्वीच ऑफ करण्यास गेले असता, त्यांना विजेचा जोरदार धक्का (Electric Shock) लागला. 

यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत दिलीप किशन पवार (वय ५९) यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक रज्जा खान तपास करीत आहेत. मृत सिद्धार्थ पवार यांच्या मागे आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT