Cyber Crime saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; साकेगाव येथील एकास ८ लाखात फसवणूक

Jalgaon News : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी मुंबईत नोकरीला आहेत. सुटी घेऊन ते काही दिवस गावी आले होते.

Rajesh Sonwane

भुसावळ (जळगाव) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून जास्तीचा मोबदला मिळेल; असे आमिष दाखवत साकेगाव येथील एका जनास तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडला असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी मुंबईत नोकरीला आहेत. सुटी घेऊन ते काही दिवस गावी आले होते. याच दरम्यान तीन जणांनी त्यांच्याशी व्हाटस्अॅपवर संपर्क साधून एक लिंक पाठविली. यानंतर त्यांना टेलिग्राममध्ये ऍड केले. त्यानंतर संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे अमिष दाखविले. (Cyber Crime) त्यानुसार समोरच्याने सांगितल्यानुसार रक्कम गुंतविली. त्या गुंतवणुकीवर नफा देण्यात येऊन विश्वास संपादन केला. 

अशा प्रकारे साधारण ८ लाख १२ हजार रुपये इतकी रक्कमेची गुंतवणूक केली. मात्र कोणताही परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या तीन अनोळखींविरुद्ध १८ ऑक्टोबरला जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

SCROLL FOR NEXT