Truck Drivers Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Truck Drivers Rasta Roko : अपघात केल्यास १० वर्ष शिक्षेच्या कायद्याविरुद्ध चक्काजाम; मुंबई- नागपूर महामार्गावर रास्ता रोको

Jalgaon Bhandara News : रस्त्यावर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्याचे आदेश केंद्र सरकारने आजपासून अमलात आणला आहे.

साम टिव्ही ब्युरो


जळगाव : रस्त्यावर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्याचे आदेश केंद्र सरकारने (Jalgaon) आजपासून अमलात आणला आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले असून आज सकाळी मुंबई- नागपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर (Bhandara) भंडाऱ्यात बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra News)

मुक्ताईनगर येथे रास्ता रोको
सरकारी नियमा विरोधात (Muktainagar) मुक्ताईनगर येथील मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकारी नियमाचा विरोध करत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून तात्काळ सरकारी नियम मागे घ्यावा; अशी मागणी ट्रक चालकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालक व वाहतूक संघटनेच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भंडाऱ्यात चालकांचा बंद 
आजपासून अपघात (Accident) झाल्यास चालकाला १० वर्षाची शिक्षा सुनावली जाणार असल्याचा कायदा केंद्र सरकारने अंमलात आणल आहे. या कायद्याच्या विरोधात देशभर चालकांची बंद फुकारला असून अनेक वाहने रस्त्यावर उभी ठेवली आहेत. तर भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरात या कायद्या विरूद्ध गाडी चालकांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT