Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : जेवणासाठी बोलवायला गेले असता बसला धक्का; पत्नी गावी गेली असताना वृद्धाने संपविले जीवन

Jalgaon News : २८ नोव्हेंबरला त्यांचे नातेवाईक त्यांना जेवणासाठी बोलवायला गेले असता त्यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला दोराने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : मुले कामानिमित्ताने बाहेरगावी तर पत्नी गावी गेली होती. या दरम्यान घरात एकटे (Jalgaon) असलेल्या ७५ वर्षीय वृद्धाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा गावात मंगळवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास उघडकीस अली. (Maharashtra News)

खापरखेडा (ता. अमळनेर) येथील साहेबराव दामू पाटील (वय ७५) हे अल्पभूधारक शेतकरी असून दोन बिघे शेतीवर त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह होता. त्यांची मुले कामानिमित्ताने बाहेरगावी राहत होती. तर साहेबराव यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या. या दरम्यान २८ नोव्हेंबरला त्यांचे नातेवाईक त्यांना जेवणासाठी बोलवायला गेले असता त्यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला दोराने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नापिकी, कर्जाचा बोजा 

साहेबराव पाटील यांचे आतेभाऊ बाबूलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर शेतीचे व हातउसनवारीचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. नापिकी व कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT