Anil Patil Saam tv
महाराष्ट्र

Anil Patil News : चौधरी बंधूंचा सूतगिरणीत महाघोटाळा; मंत्री अनिल पाटलांचा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर आरोप

Jalgaon News : सूतगिरणी सुरु करण्यासाठी १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले

संजय महाजन

अमळनेर (जळगाव) : शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी दिले होते. यासाठी अमळनेर तालुक्यात दोन वर्षात सुतगिरणी उभारून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला होता. परंतु या दोन्ही बंधूंनी मिळून दहा वर्षात सुतगिरणी तर उभारलीच नाही; पण त्यात महाघोटाळा केल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. 

जळगावच्या (Jalgaon) अंमळनेर येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

तर भरचौकात उत्तर द्यावे 

सूतगिरणी सुरु करण्यासाठी १८ कोटीवरील शासकीय भागभांडवल, त्यावरील १४ लाखांचे व्याज, सभासदांचे ९३ लाखांचे भागभांडवल आपल्या घशात घालून स्वतःचेच उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यांनी हा नुसता घोटाळा केला नसून महाघोटाळा करून अमळनेर जनतेच्या भावानांशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता माफ करणार नाही. यात खोटे असेल तर त्यांनी भर चौकात याचे उत्तर द्यावे, असे आव्हान ही मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam TV Exclusive : अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, तज्ज्ञ काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: हरवलेली आणि अपहरण झालेली मुले..., सोशल मीडियावरील अफवांवर मुंबई पोलिसांचा खुलासा

Budget 2026: DMart तर ऐकलंय; पण She-Mart म्हणजे नेमकं काय रे भाऊ? ग्रामीण महिलांसाठी ठरणार वरदान

माझी इच्छा पूर्ण कर...! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नागपुरमधील धक्कादायक प्रकार

Kitchen Tips: बटाटे फ्रिजमध्ये का ठेवू नये?

SCROLL FOR NEXT