Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : स्वस्त सोने देण्याच्या नावाने फसवणूक; २ लाख ७० हजारांत गंडा

Jalgaon News : २ ऑक्टोबरला त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून ५ हजार रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठविले.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : फसवणुकीचे नवनवीन फंडे गुन्हेगार शोधून काढत असतात. यातच भूतान देशातून स्वस्त सोने मिळवून देण्याच्या आमिषाने एका कुटुंबाला टुरिस्ट कंपनीच्या संचालकाने फसवल्याची घटना ४ नोव्हेंबर २०२३ ला घडली होती. साधारण २ लाख ७० हजार रुपयांत फसवणूक झाल्याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमळनेर (Amalner) येथील शैलेश भोगीलाल शहा (वय ६०) यांनी नया भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतान जाण्यासाठी १ ऑक्टोबर २०२३ ला बुकिंग केले होते. २ ऑक्टोबरला त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून ५ हजार रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठविले. नंतर पनारा यांच्या अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील बँकेत १ लाख रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान ३१ ऑक्टोबरला शैलेश यांची पत्नी ज्योती हिच्या मोबाईलवर कल्पेशचा फोन आला, की भूतानमध्ये सोने २७ हजार रुपये तोळे आहे. आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील व टुरदरम्यान तुम्हाला सोने मिळून जाईल, म्हणून शैलेश यांनी ४ नोव्हेंबर २०२३ ला टूर मालक पनारा याच्या ॲक्सिस बँक व बँक ऑफ बडोद्याच्या खात्यांमध्ये प्रत्येकी १ लाख ३५ हजार, असे मिळून दोन लाख ७० हजार रुपये ट्रान्सफर केले व दहा तोळे सोने बुक केले. 

यानंतर ८ नोव्हेंबरला शहा कुटुंबीय भूतानला गेले. तेथे सोन्याबाबत विचारणा केली असता, पनारा याने टुरच्या शेवटच्या दिवशी देण्यात येईल, असे सांगितले. (Fraud) १५ ला अखेरच्या दिवशी टुर मालकाला विचारले असता सोने मिळाले नाही. यावेळी अमळनेरला जा. आम्ही तुम्हाला तेथे गेल्यावर दोन लाख ७० हजार परत करू; असे सांगण्यात आले. मात्र, वारंवार विचारणा करूनही पैसे परत केले नाहीत, म्हणून अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात कल्पेश पनाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT