Amalner Crime Saam tv
महाराष्ट्र

Amalner Crime : नोकरीसाठी प्रियकराच्या मदतीने वहिनीला संपविले; अमळनेरमधील धक्कादायक घटना, नणंदसह प्रियकर ताब्यात

Jalgaon News : दोघी २२ सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते १५ मिनिटांत परत आली. परंतु, सुनबाई परत का आली नाही, म्हणून विचारले असता, कोरडी लाकडे घेऊन येते, असे सांगून मला पुढे पाठवले

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : शौचास गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा काटेरी झुडुपात खून झाल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळ समोर आली. दरम्यान अनुकंपावर नगरपालिकेत आपल्याला नोकरी लागावी यासाठी नणंदने प्रियकराच्या मदतीने वहिनीला जीवे मारल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जळगावच्या अमळनेर (Amalner) शहरात हि धक्कादायक घटना घडली आहे. अमळनेरच्या गांधलीपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी २२ सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते १५ मिनिटांत परत आली. परंतु, सुनबाई परत का आली नाही, म्हणून विचारले असता, कोरडी लाकडे घेऊन येते, असे सांगून मला पुढे पाठवले असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलगी मंगला ही (Crime News) गांधलीपुरा परिसरातून मटण घेऊन परत आली. तरी देखील सून परत आली नाही, म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुडुपात गेले असता, शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेले दिसत होते. तिला दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारूबाई घोगले या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा जय हा आजारी राहत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल लागेल. परंतु आपल्या वाहिनी ऐवजी आपण कामाला लागावे असे मुलगी मंगला हिला वाट असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने वाहिनी शीतल हीच खून केल्याचे (Police) पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्याशी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT