Amalner crime Saam tv
महाराष्ट्र

Amalner crime : शेत रस्त्यावरून वाद; मारहाणीत एकाचा मृत्यू

Jalgaon News : १९ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास मालपूर शिवारात त्यांचे पती प्रभाकर पाटील हे शेतात जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकत होते.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन वाद मारहाणीपर्यंत पोहचतो. अशाच प्रकारे जुना वाद असताना शेत रस्त्यावरून नव्याने झालेल्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मालपूर येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रभाकर विनायक पाटील (वय ४७) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. सदरची घटना १९ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मृतांची पत्नी उज्वलाबाई प्रभाकर पाटील (वय ३५) यांनी मारवड पोलिसात (Police) तक्रार दिली. दरम्यान १९ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास मालपूर शिवारात त्यांचे पती प्रभाकर पाटील हे शेतात (Jalgaon) जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकत होते. 

या दरम्यान मुरुम टाकण्याच्या कारणावरुन जुना वाद उफाडून काढत गावातीलच  ज्ञानेश्वर लहू पाटील. राजेंद्र लह पाटील. दिलबर लह पाटील. रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील, निर्जला राजेंद्र पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. (Crime News) यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मारवड पोलिस दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत उज्वलाबाई पाटील यांच्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

Heatstroke Tips: उष्माघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी करणं टाळा, वाचा कशी घ्यायची काळजी?

SCROLL FOR NEXT