Amalner Accident News Saam tv
महाराष्ट्र

Amalner Accident News: प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा पलटी; महिला प्रवाशाचा मृत्यू

Jalgaon News : प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा पलटी; महिला प्रवाशाचा मृत्यू

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : प्रवाशांनी भरलेली रिक्षा वळण रस्त्यावर पलटी होऊन यात एका महिला प्रवाशाच्या मृत्यू झाला आहे. ही घटना (Amalner) अमळनेर शहरातील बसस्थानकाजवळ घडली (Accident) आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

अमळनेर तालुक्यातील कोंढवळ येथील रहिवाशी कलाबाई बुधा पाटील (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. कलाबाई या ६ सप्टेंबरला कामानिमित्ताने रिक्षाने (Jalgaon News) अमळनेर येथून आपल्या गावी जात होत्या. त्यावेळी बसस्थानकाजवळील वळणावर रिक्षा चालक राजेंद्र रामदास भिल याचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात कलाबाई पाटील खाली पडल्या. त्यांच्या अंगावर रिक्षा पडल्याने त्या दबल्या गेल्या. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान मयत महिलेचा पुतण्या योगेश रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा चालक राजेंद्र भिल विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT