Jalgaon Airport Goa Flight Schedule:  Saamtv
महाराष्ट्र

Jalgaon Airport News: प्रवाशांसाठी गुडन्यूज! दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार, कधीपासून प्रवास करता येणार? वाचा...

Jalgaon Airport Goa Flight Schedule: कंपनीने आता हिवाळी वेळापत्रक तयार केले असून यात गोवा-जळगाव- हैदराबाद ही विमान सेवा २७ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२५ दरम्यान दररोज असणार आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव, ता. १० ऑगस्ट २०२४

जळगावकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव विमानतळावरुन गोवा-जळगाव- हैदराबाद व गोवा-जळगाव-पुणे अशी विमान सेवा सुरू केली आहे. त्यामुळे हिवाळ्यात गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्यांना आता दररोज विमान सेवा उपलब्ध होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव विमानतळावरून 'फ्लाय ९१' विमान कंपनीने गोवा-जळगाव- हैदराबाद व गोवा-जळगाव-पुणे अशी विमान सेवा सुरू केली आहे. कंपनीने आता हिवाळी वेळापत्रक तयार केले असून यात गोवा-जळगाव- हैदराबाद ही विमान सेवा २७ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२५ दरम्यान दररोज असणार आहे.

त्यामुळे हिवाळ्यात गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्यांना आता दररोज विमान सेवा उपलब्ध होणार आहे.उडान ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून 'फ्लाय ९१' विमान कंपनीने गोवा-जळगाव- र हैदराबाद अशी विमान सेवा ही आठवड्यातून तीन दिवस तर गोवा- जळगाव-पुणे ही विमान सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू केली आहे.

फ्लाय ९१ कंपनीने आता हिवाळी वेळापत्रक तयार केले असून यात गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमान सेवा ऑक्टोबर महिन्यापासून दररोज सुरू करणार आहे. पुणे व मुंबई सेवा कधी नियमित सुरू होणार? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT