Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार

Jalgaon News : दिवसभर काम केल्यानंतर दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. कानळदा रोडवरील फुफनगरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या सुसाट डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर दुचाकीवर धडकले.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कामावरून घर परतणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये येत पोलिसांना घेराव घातला होता. 

जळगाव तालुक्यातील घार्डी गावातील पंकज शंकर कोळी (वय २६) आणि कृष्णा ऊर्फ अमोल आनंदा कोळी (वय २७) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नाव आहे. दरम्यान दोघेजण सेंट्रींगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे दोघे मित्र दिवसभर काम केल्यानंतर दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. कानळदा रोडवरील फुफनगरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या सुसाट डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर दुचाकीवर धडकले. 

डंपरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीवरील पंकज आणि कृष्णा ऊर्फ अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी मदतीला धाव घेतली. घार्डीतील रवी कोळी यांनी दुचाकीवरून अमोलला ओळखले. यानंतर त्यांनी घावात घटनेची माहिती दिली. यानंतर घार्डीतील तरुणांचा अपघात झाल्याचे कळताच गावातील तरुणांनी मिळेल त्या वाहनाने घटनास्थळ गाठले. रुग्णवाहिकेतून तरुणाचे मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. घटनेनंतर डंपर चालक फरार झाला होता. 

कुटुंबाची परिस्थीती बेताची
अमोल आणि पंकज या दोघांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असून, दोघेही कुटुंबातील कर्ते तरुण असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंब हवालदिल झाले. दरम्यान अमोल यास एक वर्षाची मुलगी असून, त्यांच्या मुलीचा वाढदिवस २१ तारखेला असल्याने मुलीच्या वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन देखील त्याने करून ठेवले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT