Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

Jalgaon News : श्रावण सोमवार असल्याने भाविक जवळच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविक जात होते.

Rajesh Sonwane

जळगाव : श्रावण सोमवार असल्याने भाविक जवळच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविक जात होते. दरम्यान जळगावपासून जवळच असलेल्या वडनगरी येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी आहे. 

चोपडा (Chopda) तालुक्यातील धानोरा येथील बाबू प्रल्हाद कोळी (वय ४५) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान (Jalgaon) जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिरात सोमवारी बाळू कोळी व त्यांचा मित्र पिंटू सुतार हे सोबत दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. दर्शन घेऊन मंदिरापासून काही अंतरावरच गेले असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. 

ट्रकने दिलेल्या धडकेत बाळू कोळी व पिंटू सुतार हे दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले. त्यात बाळू कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू सुतार हे गंभीर जखमी झाले आहेत. (Accident) अपघात झाल्याने मंदिरात आलेल्या भाविकांनी जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT