Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : आईला बोलून घरातून निघाला अन्; भरधाव गाडीने दुचाकीला उडविले, दोघांचा मृत्यू

Jalgaon News : भरधाव वेगाने आलेल्या जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जीपची धडक बसल्यामुळे दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकले गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला

Rajesh Sonwane

जळगाव : अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यातच जळगाव - पाचोरा रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात भरधाव वेगाने आलेल्या जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जीपची धडक बसल्यामुळे दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकले गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जळगाव- पाचोरा रस्त्यावरील वावडदा गावाजवळ असलेल्या वळणाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाथरी येथील भावेश गोरख पाटील (वय ३८) व महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाथरी येथील भावेश पाटील, महेंद्र जाधव हे दोघेही गावातीलच संदीप शांताराम भिल (वय ३५) याच्यासोबत गावातून जळगावी कामानिमित्त येण्यासाठी निघाले होते. गावातून निघाल्यावर काही अंतरावर येताच वावळदा गावाजवळील वळणावर जीपने जोरदार धडक दिली. 

दोघांचा मृत्यू, एकजण जखमी 

जीपचा वेग अधिक असल्याने धडक बसताच दुचाकीवरील तिघेजण फुटबॉलसारखे दूर अंतरावर फेकले गेले. यात भावेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र जाधव आणि संदीप भिल अशा दोघांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे उपचार होण्यापूर्वीच महेंद्र जाधव यांचा देखील मृत्यू झाला. तर संदीप भिल याच्यावर सध्या तिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

आईची शुद्ध हरपली 

अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. तर पाथरी गावातबातमी समजताच पाथरीवासीयांनी घटनास्थळी आणि जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. भावेश पाटील, महेंद्र जाधव दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान मृत भावेश हा खासगी प्रवासी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार गेला असून आईच्या वृद्धापकाळाचा आसरा हिरावून गेला आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने भावेशच्या आईची शुद्ध हरवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT