Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : वाहनाच्या धडकेत २० फूट फेकले गेले; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Jalgaon News : मध्य प्रदेशच्या उदयपूर येथील मूळ रहिवासी असलेले रामा किसन चारण त्यांचा मुलगा अमीर हे कामानिमित्ताने उदयपूर येथून दुचाकीने धुळे येथे कामानिमित्त निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला

Rajesh Sonwane

जळगाव : दुचाकीने जात असलेल्या पिता- पुत्राला भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पिता पुत्र २० फूट अंतरापर्यंत झुडपात फेकले गेले. यात १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार वडील गंभीर जखमी झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ घडला. 

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ झालेल्या अपघातात अमीर रामा चारण (वय १३) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान मध्य प्रदेशच्या उदयपूर येथील मूळ रहिवासी असलेले रामा किसन चारण (वय ६५) हे कामानिमित्ताने दुचाकीने निघाले होते. दरम्यान रामा चारण व त्यांचा मुलगा अमीर हे उदयपूर येथून धुळे येथे कामानिमित्त निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. 

पिंपळकोठा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये पिता- पुत्र रस्त्याच्या कडेला झुडपांत फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात मुलगा अमीर चारण याचा जागीच मृत्यू झाला. तर, रामा चारण हे गंभीर जखमी आहे. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी रामा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर अमीरचा मृतदेह जळगावच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. 

वाहन चालक फरार 

दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक गाडी घेऊन फरार झाला आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान सुरुवातीला दोघांची ओळख पोलिसांनी पटविली. अमीर चारण याचा पंचनामा जळगाव तालुका पोलिसांनी केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

SCROLL FOR NEXT