Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सिहोरहून परतीचा प्रवास; तरुणाचा मृत्‍यू, महामार्गावर रस्ता ओलांडतांना अपघात

सिहोरहून परतीचा प्रवास; तरुणाचा मृत्‍यू, महामार्गावर रस्ता ओलांडतांना अपघात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सिहोर (मध्‍यप्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव व शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या महोत्‍सवात भाविक मोठ्या संख्‍येने गेले. असेच (Jalgaon) जळगाव जिल्‍ह्यातील काही भाविकांना घेवून गेलेल्या (Bhusawal) भुसावळातील तरुणाचा अपघातात (Accident) मृत्यू झाला. मंगल पाटील (वय ४२) असे मयत तरुणाचे नाव आहे. (Maharashtra News)

खंडवा शहरापासून काही अंतरावर १७ फेब्रुवारीला झालेल्‍या अपघात झाला. मंगल पाटील हा भुसावळ शहरातील कृष्णनगरात वास्तव्यास होता. मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून तो कामास होता. सिहोर येथे आयोजित कथा व रूद्राक्ष महोत्‍सवास मंगल हा खाजगी ट्रॅव्‍हलने भाविकांना घेवून गेला होता. मात्र सिहोर येथून परतीचा प्रवास करत असताना खंडवा शहरापासून काही अंतरावर अपघातात ही दुर्देवी घटना घडली.

परतीच्‍या प्रवासात गमावला प्राण

परतीचा प्रवास करत असताना भाविक महामार्गावरील एका हॉटेलवर नास्ता करण्यासाठी थांबले. यावेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगल रस्ता ओलांडत होता. याचवेळी दुसऱ्या एका लक्झरीने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुले, आई, वडील असा परीवार आहे. मंगल हा घरातील कमावता पुरूष होता. मंगलच्या मृत्यूने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Banerjee : पश्चिम बंगालमध्ये तणाव, खासदारावर जीवघेणा हल्ला

Accident: पिकअप-बुलेटचा भीषण अपघात, जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांचा जागीच मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा

Mumbai : मुंबई हादरली! कांदिवली मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग

पावसाळ्यात आंबे खायचे की नाही? खायचे असतील तर 'हे' महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा!

Maharashtra News Live Update: चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT