Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: साखरपुडा आटोपून परततांना अपघात; मुलादेखत आईचा ट्रकखाली सापडून मृत्‍यू

साखरपुडा आटोपून परततांना अपघात; मुलादेखत आई ट्रकखाली सापडून मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघात मुलाच्या दुचाकीवर बसलेली गृहिणी खाली पडली आणि मागून सुसाट वेगात आलेला ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्‍यू (Accident Death) झाला. मुलादेखत त्याच्या आईच्या अंगावरून ट्रक गेल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शीही भेदरले होते. (Letest Marathi News)

जळगावातील समतानगरनगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २६) यांच्यासोबत सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या हेात्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकीवरून सायंकाळी साडेपाचला जळगावला (Jalgaon) येण्यासाठी निघाले. नशिराबादकडे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली.

धडक होताच रस्‍त्‍याच्‍या मधोमध पडली महिला

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. कामीलच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई जुबेदाबी महामार्गाच्या मधोमध फेकल्या गेल्या. खाली पडताच त्यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेला. ट्रकच्या चाकाखाली आल्याचे त्या जागीच ठार झाल्या. कामील बेग गंभीर जखमी झाला आहे.

कुटुंबीयांचा रुग्णालयात आक्रोश

जुबेदाबी यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवल्यानंतर त्यांचा दीर नईम बेग हसन तेथे पोचला. मृतदेह दाखवताच त्याला रडू कोसळले. कुटुंबातील इतरांसह नातेवाइकांना मृतदेह न बघताच परत घरी पाठवून देण्यात आले. जुबेदाबी यांच्या पश्चात पती अल्ताफ, मुलगा कामील बेग, लहान मुलगा मोईन, मुली अल्फिया व हलिमा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT