Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : नातेवाईकांना भेटण्यासाठी जाताना अपघात; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

Jalgaon News : धरणगाव तालुक्यातील वराड येथील समाधान वना चौधरी (वय ४०) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : दुचाकीवरून आपल्या चौदा वर्षीय मुलाला घेऊन नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार फेकला गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मुलगा गंभीर जखमी आहे. सदरचा अपघात जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ घडला. 

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील वराड येथील समाधान वना चौधरी (वय ४०) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. समाधान चौधरी त्यांची पत्नी व तीन मुलांसह वराड येथे वास्तव्याला होते. दरम्यान रविवारी दुपारी एकला ते मुलगा दुर्गेशला घेऊन पहूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने जात होते. मात्र, नेरी गावानजीक आले असताना समोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली. यात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले. तर मुलगा दुर्गेश गंभीर जखमी झाला. 

अपघातानंतर जखमी दुर्गेशला जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर समाधान चौधरी यांचा मृतदेह जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वराड येथील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जळगावच्या जिल्‍हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. समाधान चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT