Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: लग्‍नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; ओव्‍हरटेक करताना सुटले नियंत्रण

लग्‍नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; ओव्‍हरटेक करताना सुटले नियंत्रण

Rajesh Sonwane

जळगाव : लग्‍नाचे वऱ्हाड घेऊन जात असलेल्‍या खासगी बस उलटून भीषण अपघात (Accident) झाला आहे. रात्रीच्‍या सुमारास मुंबई– नागपूर (Jalgaon News) महामार्गावर ओव्‍हरटेक करताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने ट्रॅव्‍हल खड्ड्यात जावून पलटी झाली. यात २४ प्रवासी जखमी झाले असून त्‍यांना तात्‍काळ उपचारासाठी दाखल केले आहे. (Latest Marathi News)

जळगाव- धरणगाव महामार्गावर हा अपघात झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अकोला येथून खासगी बस अहमदाबाद येथे लग्‍नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. या दरम्‍यान जळगाव सोडल्‍यानंतर धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावाजवळ महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात (Hospital) २२ जखमींना आणण्यात आले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील मदतीला

रविवारी रात्री नऊ– साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाळधी येथील निवासस्थानी जात होते. यावेळी त्यांनी आपली गाडी थांबवून तात्काळ जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यासाठी यंत्रणा हलवली. रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना रुग्णालयात रवाना केले. अपघातात २४ जण जखमी झाले असून सर्वांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT