Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे महिलेचा मृत्यू; दुचाकी घसरून झाला अपघात

Jalgaon News : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे महिलेचा मृत्यू; दुचाकी घसरून झाला अपघात

Rajesh Sonwane

जळगाव : दुचाकीने जात असताना अचानक गाडीसमोर कुत्रा आडवा आला. यामुळे दुचाकीचा (Jalgaon) ब्रेक दाबल्याने गाडी घसरल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात (Accident) महिलेचा जागीच मृत्यू झाला. हि घटना म्हसावद (ता. जळगाव) फाट्याजवळ घडली. (Maharashtra News)

चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. चित्राबाई या परिवारासह अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथे वास्तव्यास होत्या. ३० सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास त्या मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने जात होत्या. त्यावेळी दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या. दुचाकीसह घसरत जावून आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दोन्ही मुले झाली पोरकी 

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत झालेल्या महिलेच्या पतीचे दोनच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या अंतराने मातृ-पितृ छत्र हरपून त्यांची दोन्ही अपत्य अनाथ झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT