Manoj Jarange Patil Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: सरकारचा दगाफटका परवडणारा नाही; उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation: सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नाही, सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही म्हणून आपण आमरण उपोषण करतोय असंही जरांगे यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मण सोळुंके

Manoj jarange Patil News:

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड, श्रीगोंदा भागाचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने उद्यापासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही म्हणून आपण आमरण उपोषण करतोय असंही जरांगे यांनी स्पष्ट केले.

या उपोषणाआधी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा समाजाची बैठक होईल. त्यानंतर १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात होईल. या वेळच्या आमरण उपोषषणात आपण औषधोपचार, पाणी घेणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

छगन भुजबळांवर निशाणा..

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. "मला चॅलेंज देऊ नको, गप्प बस, पाटील असल्यानेच ओबीसीत घुसून दाखवलं, गोर गरिबांचे वाटोळ करु नका, मला करायचे नाही. नाईलाजाने मला चॅलेंज करावे लागेल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT