Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve: मंचावर भाषण सुरु असताना रावसाहेब दानवे भडकले, भर सभेतून कार्यकर्त्याला काढलं बाहेर; नेमकं काय झालं?

विविध योजनांची माहिती समजावून सांगत असताना त्यांना इतर लोक डिस्टर्ब होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते चांगलेच संतापले.....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास...

Jalana News: मंचावर भाषण सुरू असताना कार्यकर्त्याने केलेल्या गोंधळामुळे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे चांगलेच संतापल्याची बातमी समोर आली आहे. जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली असून दानवेंनी त्या हसणाऱ्या कार्यकर्त्याला भर सभेत जाब विचारत बाहेर निघून जायला सांगितले. या घटनेची सध्या जालन्यामध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) सध्या जालन्यामध्ये आहेत. जालन्यामध्ये पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाल ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ते लाभार्थ्यांना योजनेचे महत्व समजून सांगत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचीही माहिती उपस्थितांना देत होते. एकीकडे रावसाहेब दानवे यांचे भाषण सुरू असताना दुसरीकडे एक कार्यकर्ता शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करत हसत होता.

ही बाब त्यांच्या लक्षात येताच दानवेंनी त्या कार्यकर्त्याला हसण्याचा जाब विचारला.आणि संतापून त्याला तू लाभार्थी आहे का.? असा प्रश्न विचारला. तसेच त्याला उठून जायला सांगितले. दरम्यान रावसाहेब दानवे विविध योजनांची माहिती समजावून सांगत असताना त्यांना इतर लोक डिस्टर्ब होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते चांगलेच संतापले. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Jalana News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT