Jalana Crime Saamtv
महाराष्ट्र

Jalana Crime News: आधी देवदर्शन केले अन् मंदिरासमोरील दुचाकी घेवून पळाला... संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पाहा VIDEO

Jalana Crime: या दुचाकी चोराला पकडण्याचं मोठं आव्हान आत्ता पोलिसांसमोर उभं ठाकल आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalana News: जालना शहरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे नागरीकांची चिंता चांगलीच वाढली आहे. अलिकडेच शहरातील मंमादेवी मंदिरा समोरून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीचा संपूर्ण प्रकार मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी तरुणांची चिंता वाढवली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. अलिकडेच शहरातील मंमादेवी मंदिरा समोरून सतिश कुरील यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. या संंपूर्ण घटनेचा व्हिडिओही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, हा दुचाकी चोर एका दुचाकीवर बराच वेळ बसतो. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून दुचाकी घेऊन पसार होतो. विशेष म्हणजे हा चोर चोरी करण्यापुर्वी मंदिरात जाऊन देवीच्या दर्शन ही घेतो. त्या ठिकाणी असलेल्या दोन महिलांशी चर्चा ही करतो. त्यानंतर कोणाला संशय येऊ नाही म्हणून मंदिराबाहेर येऊन एका दुचाकीवर येऊन बसतो.

त्यानंतर मंदिरात दर्शनाकरता आलेल्या एका भाविकाची दुचाकी घेऊन पसार होतो. त्याची ही चालाखी मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात असून, या दुचाकी चोराला पकडण्याचं मोठं आव्हान आत्ता पोलिसांसमोर उभं ठाकल आहे. (Jalana Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT