Jalana Crime News Saamtv
महाराष्ट्र

Jalana Crime: वडिलांकडून पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्या केल्याचा बनाव; भयंकर घटनेने जालन्यात खळबळ

Jalana Crime News Update: वडिलांनीच गळा दाबून केली हत्या , दिशाभूल करण्यासाठी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव |धक्कादायक कारण समोर...

लक्ष्मण सोळुंके

Jalana Bhokardan Crime: दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच त्याची गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. तसेच हत्येनंतर मुलाने आत्महत्या केल्याचा बनावही रचण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे. भोकरदन तालुक्यातील विझोरा गावातील ही घटना असून परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य गजानन आढाव असं हत्या झालेल्या मुलाचं असून आदित्य हा वारंवार वडील गजानन आढाव व आई संगिताबाई आढाव यांच्याशी दारूच्या नशेत वाद घालत होता आणि वडिलांना मारहाण करत होता. काल ही आदित्यने दारूच्या नशेत येऊन घरात आई आणि वडिलांना त्रास देण्यास सुरवात केली. यावेळी त्याने वडिलांना आणि आईला मारहाण केली. (Jalana News)

त्याच्या या दरोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी पत्नी संगिताबाई आढाव यांना घराबाहेर बसण्यास सांगुन मयत मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. (Latest Marathi News)

या प्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वडिल गजानन आढाव यांची अधिक चौकशी केली. यावेळी आपणच आदित्यचा गळा आवळून खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यानंतर संगिताबाई आढाव यांच्या फिर्यादीवरुन पती गजानन आढाव यांच्य विरुद्ध मुलाचा खुन केल्या प्रकरणी पारध पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी अधिक तपास पोलीस करत असून गजानन आढाव यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

Cotton Trendy Saree: सणासुदीला दिसा स्टायलिश अन् कम्फर्टेबल; कॉटन साडीचे 'हे' ७ डिझाइन्स ठरतील परफेक्ट

Health Care Tips : सतत रूम फ्रेशनर वापरताय? तुम्हाला आहे 'या' गंभीर आजारांचा धोका

Bank Account : १, २ की ३ बँक अकाउंट? जास्त अकाउंट्स असतील तर ७ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

SCROLL FOR NEXT