Jalana Crime Saamtv
महाराष्ट्र

Jalana Crime News: किरकोळ कारणावरून वाद! दोन गटात तुफान हाणामारी; महिलेसह ५ जण गंभीर जखमी

काहीजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

लक्ष्मण सोळुंके

Devgaon Crime News: बदनापूर तालुक्यातील देवगावात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एक महिला सह पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Badanapur Crime News )

याबाबत अधिक माहिती अशी की, बदनापूर तालुक्याच्या देवगावात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यामधील काहीजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. तसेच देव गावात जाऊन घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही गटावर परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या...

पुणे शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. पुण्यातील वाघोली भागात प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT