Maharashtra Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Jalna News: महावितरणाच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात पडलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; १५ दिवसांपासून देत होते तक्रार

Maharashtra Breaking News: जालना तालुक्यातील पाणेवाडी येथे शेतात काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मुत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, ता. ३० जून २०२४

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जालन्यामध्ये घडली. नामदेव जंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून जालना तालुक्यातील पाणेवाडी शिवारात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना तालुक्यातील पाणेवाडी येथे शेतात काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मुत्यू झाला. नामदेव जंदे (वय 60, रा. पानेवाडी ता.जि. जालना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नामदेव जंदे आणि त्यांच्या पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी ही घटना घडली.

जंदे यांच्या शेतात मागील 15 दिवसांपासून महावितरणच्या तारा तुटून पडल्या आहेत. याबाबत जंदे यांनी महावितरण कंपनीला वारंवार पोल आणि तारा उचलण्यास सांगितले होते. मात्र महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही दुर्दैवी घटना घडली.

नामदेव जंदे हे शेतात काम करत असताना त्यांच्या हाताला विजेची तार चिटकली. त्यात विजेचा धक्का लागल्याने नामदेव यांचा करुण अंत झाला. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ सवयी अंगीकारा आणि जीवनात मिळवा मोठे यश

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, ७५० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Suyash Tilak : मराठमोळ्या अभिनेत्याच्या गाडीचा अपघात; तासाभराने मिळाली मदत, पाहा VIDEO

Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT