Parbhani Accident News saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: रिल्सच्या नादात युवकांच्या दुचाकीची जैन मुनिंसह एकास ठाेकर

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

राजेश काटकर

Parbhani : परभणी (parbhani) जिल्ह्यातील बोरीहून जिंतूरकडे (bori jintur accident news) पायी येत असलेले सौम्य सागर मुनी महाराज (sagar jain muni maharaj) यांच्यासह अन्य एकजण दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले आहेत. दाेन्ही जखमींना विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. (Maharashtra News)

ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनूसार एका दुचाकीने जैनमुनी महाराज यांना जोरदार धडक दिली. या अपघातात महाराजांसह दोघेजण गंभीर जखमी झाले.

सौम्य जैनमुनी महाराजांसह सहा महाराज बोरीहून जिंतूरला पायी चालत येत हाेते. त्यांच्यात एकमेंकापासून काही अंतर पडले होते. दोन भक्तांसोबत सौम्य सागर महाराज पुढे चालत असताना दरम्यान तिघेजण बसलेले दुचाकी भरधाव वेगाने पाठीमागून आले. या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

तिघे तरुण मोबाईलवर रिल्स बनवत होते. दुचाकीच्या धडकेने महाराज व त्यांच्यासोबत असलेल्या संकेत मोहारे या दोघांच्या पायाला जबर मार लागला. संकेत मोहारे यास परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

महाराज कोणत्याही वाहनाचा वापर करत नसल्याने त्यांना स्ट्रेचरवर झोपवून तरूणांनी त्यांना अपघाताच्या ठिकाणापासून जिंतूरपर्यंत बारा किलाे मीटर अंतर पायी चालत आणले. महाराजांच्या पायाला गंभीर मार लागलेला असला तरी सुर्यास्तानंतर ते काही घेत नसल्याने त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला. डॉ. परिहार यांच्या रूग्णालयात महाराजांना विश्रांती घेण्याची विनंती करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT