Maharashtra Kesari  Saam Tv
महाराष्ट्र

Satara : साहेबराव पवारांचा एककल्ली कारभार; महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवरून जाधव कुटुंबियांचा आरोप

स्पर्धेवर ऑलम्पिकवीर श्रीरंग अप्पा जाधव यांच्या कुटुंबियांकडून आणि जिल्ह्यातील काही नावाजलेल्या पैलवांनानी टाकला बहिष्कार आहे.

ओंकार राजेंद्र कदम

सातारा : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. साहेबराब पवार कुटुंबीयांकडून घराणेशाही सुरू असल्याने स्पर्धेवर ऑलम्पिकवीर (Olympic) श्रीरंग अप्पा जाधव यांच्या कुटुंबियांकडून आणि जिल्ह्यातील काही नावाजलेल्या पैलवांनानी टाकला बहिष्कार आहे. आज पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ज्यांच्या घरात कोणी पैलवान नाही कधीही, ज्यांनी कधीही कुस्ती खेळली नाही त्यांनी आमच्यावर वस्ताद गिरी करू नये, अशी टीका यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै.साहेबराव जाधव यांनी साहेबराव पवार यांच्या कुटुंबियांवर केली. पैलवानांसाठी कै.श्री छ. प्रतापसिंहराजे भोसले यांचे योगदान खूप महत्वाचे आहे, अस श्रीरंग जाधव यावेळी म्हणाले. आज सातारा (Satara) येथे पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेवर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली.

खरंतर ही स्पर्धा प्रा. दिलीप पवार, पै. साहेबराव जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी कुस्तीगीर (wrestling) परिषेदस मागणी केली होती. त्यानुसार परिषदेने मान्यता दिली. ही स्पर्धा सातारा येथे होत असल्याचे समजताच तालीमचे साहेबराव पवार हे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले आणि आम्हांला आयोजनात घ्या असे म्हटले, त्या नंतर शरद पवार यांनी सर्वांनी एकत्रपणे आयोजन करा असे सांगितले. तेथून आल्यावर साहेबराव पवार आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीव यांनी एकाकी कारभार केला असेही वनराज जाधव यांनी यावेळी नमूद केले.

साताऱ्यात सुरू असलेल्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मान अपमानाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. साहेबराब पवार कुटुंबीयांकडून घराणेशाही सुरू असून एकाधिकारशाही होत असल्याचा आरोप पैलवान श्रीरंग जाधव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पवार कुटुंबियांच्या ताब्यात असलेली सातारा जिल्हा तालीम संघ आणि ऑलम्पिकवीर श्रीरंग अप्पा जाधव यांच्या कुटुंबियांच्यात कुस्ती आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. जाधव कुटुंबीयांनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. (Maharashtra Kesari)

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT