सतेज पाटील SaamTvNews
महाराष्ट्र

अवैध गुटखा विक्रीवर प्रतिबंध घालणे अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम - सतेज पाटील

गुटखा बंदीची अंमलबजावणी हे काम प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

अरुण जोशी

अमरावती - कायदा व सुव्यवस्था राखण्याची जवाबदारी पोलिसांची असली तरी अवैध गुटखा विक्रीवर प्रतिबंध घालण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे. अवैध गुटखा विक्रीची माहिती मिळाल्यास पोलीस स्वतःहून कारवाई करतातच मात्र संबंधित विभागाने देखील पोलिसांना माहिती दिल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.

हे देखील पहा :

मात्र, गुटखा बंदीची अंमलबजावणी हे काम प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच नगरविकास, राज्य परिवहन महामंडळ, परिवहन विभागासह इतर विभागांची देखील आढावा बैठक घेतली.

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसला आहे. राज्य सरकार व एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची चर्चा सुरु असून आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. ज्या ग्राहकावर एसटी अवलंबून आहे त्याला अशा प्रकारे अडचणीत आणणे योग्य नाही असही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT