Sangli, Shivsena, Uddhav Thackeray, Islampur, Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Shivsainik : ठाकरेंच्या शिवसैनिकावर खूनी हल्ला; शिंदे गटाच्या सहा जणांवर गुन्हा दाखल, तिघे ताब्यात

या मारहाण प्रकरणी पाेलिस कसून तपास करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर (islampur) येथील शिवसेनेच्या (shivsena) माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांच्यावर लोखंडी गजाने खुनी हल्‍ला केल्याप्रकरणी तिघा संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे. (Shivsena Latest Marathi News)

शिवकुमार शिंदे हे सोमवारी सकाळी दूध घेवून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. मंत्री कॉलनी ते हनुमाननगर रस्त्या दरम्यान संशयितासह त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी शिवकुमार यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीत मारहाण केली. या मारहाणीत शिवकुमार यांच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

दरम्यान खुनी हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा तालुकाप्रमुख (शिंदे गट) (Eknath Shinde) सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटात या म्हणून हल्ला केल्याचे आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे आणि त्याचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT