Irshalwdi Landslide news Saam Digital
महाराष्ट्र

Irshalgad Landslide News : आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ सगळे दरडीखाली अडकले, आश्रमशाळेत असलेल्या मुलीचे भयावह दृष्य पाहून अश्रू थांबेना

Raigad News : या दुर्घटनेत जे बचावले आहेत,ते जीवलगांच्या परत येण्याकडे डोळे लावून बसले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and Updates : रायगड  जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक संसार या दरड दुर्घटनेत उद्ध्वस्त झाले आहे. या दुर्घटनेत जे बचावले आहेत,ते जीवलगांच्या परत येण्याकडे डोळे लावून बसले आहे.

घटनास्थळावरील परिस्थिती कठीण नातेवाईकांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. इर्शाळवाडीतील एक मुलगीही सुदैवाने बचावली आहे. ही मुलगी आश्रमशाळेत शिक्षण घेत असल्याने घरापासून लांब होती. जयश्री वाघ असं या मुलीचं नाव आहे. इर्शाळवाडीत राहणाऱ्या किसन वाघ यांची ही मुलगी आहे.

जयश्रीचे आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ असे सर्वच दरड दुर्घटनेमध्ये गाडले गेले आहेत. जयश्री आश्रमशाळेत होती म्हणून ती वाचली. मे महिन्यात मुलगी आपल्या कुटुंबीयांना भेटून पुन्हा आश्रमशाळेत गेली होती. (Latest News)

मात्र दुर्घटनेनंतर जयश्री इर्शाळवाडीत परतली तर तिचे डोळे तिच्या कुटुंबियांना शोधत आहेत. तिचे हुंदके आणि डोळ्यातील अश्रू थांबायचं नाही घेत नाहीत. आपण पोरकं झाल्याचं दु:ख तिच्या डोळ्यात दिसत आहे. मात्र आपले कुटुंबिय ढिगाऱ्याखाली सुखरुप सापडतील ही आशा तिला आहे. आपलं दु:ख बाजूला सारून एकट्या पडलेल्या जयश्रीला नातेवाईक धीर देताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT