Irfan Shah
Irfan Shah Saam Tv
महाराष्ट्र

लोणावळ्यात सहलीला आलेला दिल्लीतील तरुण बेपत्ता; शोधून देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळ्यात (Lonavla) सहलीला आलेला एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा तरुण दिल्ली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचा शोध लोणावळा पोलीस तसेच मावळ येथील तरुण घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज येथे सहलीला आलेला दिल्ली (Delhi) मधील पर्यटक शुक्रवार पासून जंगलात बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव इरफान शाह आहे. तो अभियंता असून दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली.

लोणावळा ग्रामीण पोलीस (Police), मावळ वन्यजीव सरंक्षक आणि शिवदुर्ग ग्रुप या युवकाचा दाट जंगलात शोध घेत आहेत. ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेण्यासाठी पथके ही तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे फरहान शहा यांच्या परिवाराने एक पत्रक प्रसिद्धीसाठी काढले आहे. जो कोणी बेपत्ता फरहान शहा याला शोधून काढेल त्याला एक लाखाचे बक्षीस मिळणार, असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT