Hotel business in trouble due to gas shortage; Commercial gas-fired wood and coal-fired stove base. saam tv
महाराष्ट्र

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

LPG Crisis: इराण अमेरिका युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालीय. त्यामुळे जनता गॅसवर गेलीय. तर हॉटेल चालकांना आता लाकडं आणि कोळशाचा आधार घ्यावा लागलाय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालीय. त्यामुळे सरकारने व्यावसायिक गॅसवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आता हॉटेल मालकांवरमध्ये चूल पेटवण्याची वेळ आलीय. ही गॅस टंचाईसदृश्य परिस्थिती फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच नव्हे तर यवतमाळमध्येही हॉटेल चालकांपैकी काही जणांनी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरु केलाय. तर काही हॉटेल चालकांनी चुली पेटवून हॉटेल सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. त्यामुळे मेस चावकांवरही थेट चूल पेटवण्याची वेळ आलीय. ग्रामीण भागातच नाही तर पुण्यापाठोपाठ मुंबईतही हॉटेल चालकांनी व्यावसाय सुरु ठेवण्यासाठी चुलीचा आधार घेतलाय. एवढंच नाही तर शहापूरमध्येही हॉटेल चालकांनी कोळशाच्या शेगड्या बाहेर काढल्या आहेत. त्यामुळे गॅस टंचाईच्या परिस्थितीत लाकडाच्या वखारी आणि कोळसा तयार करणाऱ्यांना सुगीचे दिवस आलेत. कोळसा आणि लाकडाचे दरही वाढले आहेत.

आता सरकारने गॅस टंचाईवर मार्ग काढला नाही तर उर्वरित हॉटेल चालकांनाही चुलीचा पर्याय स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी लाकडं आणि कोळसा कसा उपलब्ध होणार आणि तोही किती काळ हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हॉटेल्स चालवण्याचा मार्ग खडतर दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीमध्ये 21 नायझेरियन ताब्यात

कोळशाच्या खाणीत मोठा स्फोट; 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ

Shocking : रक्षक बनला भक्षक! तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवली, वेळोवेळी ठेवले शारीरिक संबंध; पोलीस कर्मचाऱ्याचे काळे धंदे उघड

LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

SCROLL FOR NEXT