ips sameer shaikh, satara, ganpati festival, satara ganpati utsav saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival 2023 : हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन; नाशकात मुस्लिम युवक गणरायाच्या सेवेत; एसपी शेख यांच्या बाप्पाच्या मिरवणुकीचा साता-यात बाेलबाेला (पाहा व्हिडिओ)

आज राज्यभरात सकाळपासून घरोघरी गणपतीचे प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.

Siddharth Latkar

- अभिजीत साेनवणे, सिद्धार्थ लाटकर

Ganeshotsav 2023 : पाच सहा सात आठ...गणपतीचा थाटमाट असा जयघाेष करीत अबालवृद्धांनी आज लाडक्या बाप्पाला घरी आणले. गणेशाेत्सवाचा उत्साह शिगेला पाेहचला असून उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पाेलिस दल देखील सज्ज झाले आहे. असे असले तरी देशभरात गणेशाेत्सव सर्वधर्मीयांकडून माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे, याची अनेक उदाहरणे देखील आहेत. (Maharashtra News)

नाशिक येथे गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम सर्वधर्म समभाव आणि एकात्मतेचं दर्शन घडतंय. अस्लम सय्यद हा मुस्लिम तरुण गणपती बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक फेटे आणि पगडी बांधण्याचं काम करतो.

साम टीव्हीशी बाेलताना अस्लम म्हणाला मी गणपती बाप्पाला सर्व प्रकारची वस्त्र परिधान करुन देताे. मला बाप्पाची सेवा करायला खूप आवडते.

सातारा येथे देखील गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाले. घराेघरी बाप्पाची विधीवत पूजा केली जात आहे. साता-याचे पोलीस अधीक्षक समीर शेख (ips sameer shaikh) यांनी सपत्निक गणेशाची पूजा केली. पारंपरिक वाद्याचा निनादात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले.

एका छाेट्याशा पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली हाेती. पोलीस बँड पथकाची बाप्पांना साथ हाेती. यावेळी माेठ्या उत्साहात शेख यांनी बाप्पांचे घरात स्वागत केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT