IPL Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Betting : आयपीएल मॅचेसवर सट्टा; भंडारा, वाशिममध्ये छापा टाकत कारवाई

Bhandara News : कोणता संघ जिंकणार, कोण किती गडी बाद करणार आणि कोण किती धावा करणार यावर सट्टा लावला जात आहे. अशाच प्रकारे शनिवारी झालेल्या सामन्यांवर सट्टा लावताना पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख/ मनोज जयस्वाल 

भंडारा/ वाशीम : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मॅचेसचा थरार सध्या सुरु आहे. क्रिकेट लीग आता रोमांचक स्थितीत आली असून रोज होत असलेल्या प्रत्येक मॅचवर जोरदार सट्टा लावला जात आहे. अशाच प्रकारे ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. भंडार्याच्या तुमसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तर वाशिममध्ये कारवाई करण्यात आली आहे. 

ऑनलाईन क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात चालविले जात आहे. आयपीएलच्या मॅचेस रंगत असताना प्रत्येक मॅचमधील सामन्याच्या शेवटच्या बॉल पर्यंत सट्टा लावला जात आहे. प्रामुख्याने कोणता संघ जिंकणार, कोण किती गडी बाद करणार आणि कोण किती धावा करणार यावर सट्टा लावला जात आहे. अशाच प्रकारे शनिवारी झालेल्या सामन्यांवर सट्टा लावताना पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. 

यावर्षीच्या आयपीएल हंगामातील सहावी कारवाई
भंडारा
: भंडाऱ्याच्या तुमसर इथं दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या जुगार अड्ड्यावर तुमसर पोलिसांनी छापे टाकले. रात्रीला केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर, फरार झालेल्या अन्य आरोपींचा तुमसर पोलीस शोध घेत आहे. या कारवाईत मोबाईल, दुचाकी, लॅपटॉप यांच्यासह क्रिकेट बेटिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तुमसर उपविभागातील या वर्षीच्या आयपीएल क्रिकेट हंगामातील ही सहावी कारवाई आहे.

अनसिंगमध्ये कारवाईत १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशीम : वाशिमच्या अनसिंग येथील सराफा लाईन परिसरात ऑनलाइन क्रिकेट सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली. यामध्ये राहुल दत्तात्रेय निंबेकर अनसिंग येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक मोबाईल, एक टीव्ही आणि रोख ७९ हजार १०० असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT