CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Saam Digital News
महाराष्ट्र

आषाढीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मंदिर समितीकडून निमंत्रण

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे या नवीन सरकारने विधासभेत बहुमतही सिद्ध केलं. (CM Eknath Shinde Latest News)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या पूजेचं निमंत्रण दिलं. आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नव्हते.

कोरोना संकटात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वारकऱ्यांशिवाय ही महापूजा करावी लागली होती. मात्र यंदा कोरोनाचे संकट सावरल्यानंतर आषाढी वारीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. (Eknath Shinde Latest News)

मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. पण त्यानंतर शिंदे यांनी बंड पुकारला आणि देवेंद्र फडणवीस हे महापूजा करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण अचानक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आलं आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री आता विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT