Jayant Patil-Rohit Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil-Rohit Pawar : रोहित पवारांसोबत पक्षांतंर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील म्हणाले, 'मी गरीब माणूस...'

Jayant Patil-Rohit Pawar Political News : राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर महत्त्वाचं शिबिर शिर्डी येथे पार पडत आहे. मात्र शिबिराला रोहित पवार यांनी पाठ फिरवली आहे.

प्रविण वाकचौरे

Shirdi News :

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे पार पडत आहे. राज्यभरातील सर्व नेते, पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांच्यासोबतच्या सुप्त संघर्षामुळे रोहित पवार यांनी शिबिराला पाठ फिरल्याची चर्चा सुरु आहे. यावर जयंत पाटील यांनी वक्तव्य करत, चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर महत्त्वाचं शिबिर शिर्डी येथे पार पडत आहे. मात्र शिबिराला रोहित पवार यांनी पाठ फिरवली आहे. दोन्ही दिवस रोहित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, रोहित पवार परदेशात आहे. शरद पवार यांनी याबाबत मला आधीच माहिती दिली होती. (Latest Marathi News)

शिबिराची आज आणि उद्या दोन दिवस शिबिराची मुदत आहे. रोहित पवार परदेशी गेले आहेत. शिबिराची तारीख दिल्या दिल्या शरद पवार यांनी मला याबाबत माहिती दिली. त्यांना पहिल्या दिवशी हजर राहता येणार आहे. पण ते आज संध्याकाळी भारतात येऊन दुसऱ्या दिवशी शिबिराला हजर राहू शकतात, असं त्यांनी कळवलं आहे.

मी गरीब माणूस...

रोहित पवारांसोबत कलह असल्याच्या चर्चांवर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, मी गरीब माणूस आहे. माझे कुणाशीही वाद होऊ शकत नाहीत. मी पक्षाचं काम करत आहे. जे सोबत येतील त्यांच्या घेऊन काम करण्याची आमची भूमिका आहे.

सुनील तटकरे यांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत बोलताना मोठा दावा केला आहे. सध्या कोण कुठे आहे ते माहित नाही. पण त्यातील कधी कोण बाहेर पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार गटाला आणखी धक्का बसणार की काय असं सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT