INSPIRING NEET STORY: STUDENT OVERCOMES KIDNEY FAILURE TO CHASE DOCTOR DREAM Saam Tv
महाराष्ट्र

NEET Paper Leak : NEET साठी विद्यार्थ्याने गमावली किडनी, आजीच्या किडनीवर झुंज सुरू; लातूरच्या पोराची हृदयद्रावक कहाणी

Maharashtra Latur NEET Exam 2026 Paper Leak : लातूरच्या विश्वजीत तेलंगेने दोन किडन्या निकामी झाल्यानंतरही हार न मानता NEET परीक्षेसाठी पुन्हा उभं राहण्याचा निर्धार केला आहे. आजीच्या किडनी दानामुळे मिळालेल्या नव्या आयुष्याने त्याची जिद्द अधिकच बळकट झाली आहे.

Alisha Khedekar

  • लातूरच्या विश्वजीतने चार वर्षे NEET साठी मेहनत घेतली

  • आजारामुळे दोन्ही किडन्या निकामी, डायलिसिसवर उपचार

  • आजीच्या किडनी दानामुळे यशस्वी ट्रान्सप्लांट

  • संकटांवर मात करून पुन्हा NEET साठी सज्ज

संदीप भोसले, लातूर

आयुष्यात संकटांची मालिका येत जात असते, मात्र तिला न जुमानता पुढे जाणं आणि यशाचा टप्पा पार पाडणं ही खरी जिद्द. ही जिद्द मनात असेल तर यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. याचं जिद्दीच्या जोरावर लातूरमधील विश्वजीत तेलंगे या विद्यार्थ्याने आजाराशी दोन हात करत पुन्हा नव्याने उभं राहण्याचा निर्धार केला आहे. त्याची ही प्रेरणादायी कहाणी जगासाठी एक उत्तम उदाहरण ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक स्वप्न मनात बाळगून विद्यार्थ्यांनी दिवस रात्र एक करून तयारी केली होती, मात्र पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं खच्चीकरण झालं. अनेक जण हताश झाली. मात्र मागील चार वर्षांपासून विश्वजीत नीट परीक्षेची तयारी करत होता. त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दिवस-रात्र अभ्यास केला. मात्र या प्रवासात त्याने स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जे त्याच्या शरीरासाठी घातक ठरलं. परिणामी, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या.

गेल्या एका वर्षापासून विश्वजीत डायलिसिसवर होता. अशा कठीण अवस्थेतही त्याने आपलं स्वप्न सोडलं नाही. काही दिवसांपूर्वी त्याची किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे, त्याच्या आजीने त्याला किडनी दान करून नातवाच्या स्वप्नांना नवं आयुष्य दिलं. शस्त्रक्रियेनंतरही विश्वजीतने हार न मानता ३ मे रोजी चौथ्यांदा नीट परीक्षा दिली. मात्र, यावेळीही पेपर फुटीचा प्रकार समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता ती २१ जून रोजी होणार आहे.

या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी खचले असताना, विश्वजीत मात्र पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला आहे. “कितीही वेळा परीक्षा घ्या, मी पुन्हा पुन्हा देणार,” असे ठाम शब्दांत विश्वजीत आपला आत्मविश्वास व्यक्त करतो. त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि न डगमगणारा आत्मविश्वास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही कहाणी केवळ एका विद्यार्थ्याची नाही, तर संकटांवर मात करत स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येक तरुणाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 League Mumbai: फायनलमध्ये मराठाची 'रॉयल' एन्ट्री; नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजयरथ रोखत अंतिम फेरीत धडक

जमीन थरथरली, लोक घाबरून घराबाहेर पळाले; शहराला बसले भूकंपाचे सौम्य धक्के

पुण्यानंतर सांगलीत गोळीबाराचा थरार; बड्या नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या

पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी? सुरूवातीला 15 हजार कोटींचाच निधी?

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

SCROLL FOR NEXT