सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - Saam Tv
महाराष्ट्र

सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्यांबाबत चौकशी समिती स्थापन

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली Sangli जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या Bank विविध घोटाळ्यांच्या बाबतीत दाखल झालेल्या तक्रारीवरून सहकार विभागाने CO operative Department चौकशी समिती नेमून 21 दिवसात अहवाल देण्याचा आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे Pune सहकार आयुक्तांच्या आदेशावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तक्रारींबाबत 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. Inquiry committee for sangli district bank misappropriations

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक Elections जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यांच्या बाबतीत दाखल झालेल्या तक्रारीवरून आतां चौकशी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार मानसिंगराव नाईक, तसेच 9 संचालक मंडळ आणि स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांच्या दाखल झालेल्या तक्रारी नंतर सहकार विभागाच्या वतीने बँकेच्या घोटाळ्यांच्या बाबतीत असणाऱ्या तक्रारी बाबत चौकशी समिती स्थापन करून 21 दिवसात अहवाल देण्याचे आदेश सहकार विभागाला देण्यात आले आहेत.

नोकर भरती घोटाळा,बँकेच्या विविध शाखा नूतनीकरणासाठी करण्यात आलेला अनावश्यक खर्च, त्याचबरोबर भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या कडेगाव तालुक्यातल्या डोंगराई येथील केन अॅग्रो साखर कारखान्याचे कर्ज वसुली,व बेकायदेशीर कर्ज देण्यासह विविध तक्रारी दाखल झाल्या आहेत. Inquiry committee for sangli district bank misappropriations

काही दिवसांपूर्वी पुणे सहकार आयुक्तांच्या कडून बँकेच्या चौकशीबाबत कोल्हापूर जिल्हा विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता सहकार विभागाकडे शिराळयाचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह 9 संचालकांचे आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे सहकार विभागाकडून पुणे सहकार आयुक्तांना बँकेच्या तक्रारीच्या बाबतीत चौकशी समिती स्थापन करून 21 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानंतर पुणे विभागाकडून कोल्हापूर जिल्हा विभाग आला चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीकडून 21 दिवसात अहवाल देण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तक्रारीची आणि चौकशीची व्याप्ती आता वाढली आहे...

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

IMD Report: देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता; वाचा IMD रिपोर्ट

Shukra Gochar 2024: शुक्राच्या राशी बदलामुळे 'या' ३ राशी होणार धनवान

SCROLL FOR NEXT