Gautami Patil News  Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil News : सबसे कातील गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा बरसले इंदुरीकर महाराज; सांगितला स्वत: अनुभवलेला प्रसंग

Indurikar Maharaj VS Gautami Patil: थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी उपस्थितांना यावेळी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Indurikar Maharaj : बीडनंतर आता शिर्डी येथे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनादरम्यान नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर निशाणा साधलाय. शिर्डी येथे भरलेल्या देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपानिमित्ताने काल इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. (Shirdi)

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला आहे. मात्र तीन गाण्यांसाठी दीड लाख रुपये देतात. तीनच गाणी पण शिट्ट्या...? गाडा आला आणि घाटात राडा झाला, असं म्हणतात. थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी उपस्थितांना यावेळी दिला आहे.

या आधी देखील इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर टीका केली होती. बीडच्या आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे निवत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीर्तनकारांच्या प्रश्नांवर बोलताना इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता गौतमी पाटीलवर निशाणा साधला.

बीडमध्ये असताना इंदुरीकर महाराज म्हणाले होते की, " तिने 3 गाणे वाजवून तीन लाख घेतले, तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघे फुटले पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही. आम्ही पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतता काय खरंय त्यांचं, सगळी जनता लुटली असे म्हणतात असे निवृत्ती महाराज म्हणाले.

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला नेहमीच गर्दी उफाळून येते. त्यांच्या विनोदी शैलीचे अनेक चाहते आहेत. ते नेहमीच सद्य स्थितीवर बोलताना दिसतात. अशात आता त्यांनी थेट सबसे कातील अशी ओळख असलेल्या गौतमीला डिवचल्याने पुढे काय होणार या कडे साऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT