lndurikar Maharaj
lndurikar Maharaj saam tv
महाराष्ट्र

lndurikar Maharaj: 'इंदुरीकर महाराजांनी ठरवलं तर परदेशात जाऊन इंग्लिशमध्ये कीर्तन करतील', असं कोण म्हणालं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagar News: जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी थोरातांचे भाचे आणि निवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे आणि त्यांची मुलगी जयश्री थोरात हे देखील उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात उपाचारासाठी मुंबईत असल्याने कीर्तन संपल्यानंतर थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी मामाच्या वाढदिवसाचा केक कापत जयश्री थोरातांना केक भरवला.

यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले, एक काळ असा होता की राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी दिशा ठरवायचे आणि लोकं त्यांचं बघून काम करायचे. आता जमाना बदललाय. लोकांना जे आवडतं ते नेत्यांना करावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सत्यजित तांबे म्हणाले. (Latest Marathi News)

या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांविषयी बोलताना तांबे म्हणाले की, इंदुरीकर महाराजांकडे पाहून सोशल मीडियावर अनेक किर्तनकार तयार झालेत, पण ते सगळे डुप्लिकेट आहेत. फक्त महाराजांची स्टाईल घेतली म्हणजे विचार येत नाहीत. महाराज महाराज आहेत. त्यांनी ठरवलं तर ते परदेशात जाऊन इंग्लिशमध्ये कीर्तन करतील अशा शब्दात तांबे यांनी इंदुरीकर महाराजांवर स्तुतीसुमने उधळली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

SCROLL FOR NEXT