UDGIR MYSTERY DEATH: EX-SERVICEMAN FOUND DEAD IN DECOMPOSED STATE Saam Tv
महाराष्ट्र

Latur : माजी सैनिकाच्या बंद घरातून कुजलेला वास, पोलिसांनी दार उघडताच समोर दिसलं भयंकर चित्र, लातूरमध्ये खळबळ

Latur Udgir News : लातूरच्या उदगीरमध्ये एका माजी सैनिकाचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दुर्गंधीमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उदगीरमध्ये माजी सैनिकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

  • दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय, पोलिसांना माहिती

  • मृत्यू चार दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

संदीप भोसले, लातूर

लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका माजी सैनिकाचा मृतदेह त्याच्याच राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बाबुराव सासट्टे (वय ३९, रा. उदगीर) असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते मूळचे जळकोट तालुक्यातील अतनूर येथील रहिवासी होते. मागील काही वर्षांपासून ते उदगीर येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. सासट्टे यांच्या घरातून काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत होती. सुरुवातीला शेजाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र दुर्गंधी वाढत गेल्याने त्यांनी संशय व्यक्त करत तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचे दार उघडून आत प्रवेश केला असता, सासट्टे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, त्यांचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात असून, कोणताही संशयास्पद प्रकार आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सासट्टे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शांत आणि साधे जीवन जगणाऱ्या सासट्टे यांच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा करावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Kulkarni: गौरी कुलकर्णीचं खास फोटोशूट; जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य, साधेपणात खुलला स्टायलिश अंदाज

Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra News Live Update : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर लोखंडी पाईप कोसळला

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT