Indian Railways announces major infrastructure upgrades and bullet train projects to transform travel in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

मुंबई, नाशिक अन् पुण्याला रेल्वेचं मोठं गिफ्ट... वाचा काय काय फायदा होणार?

Nashik Kumbh Mela Railway Master Plan Details: महाराष्ट्रासाठी रेल्वेचा मोठा विकास आराखडा जाहीर रेल्वे मंत्र्यांनी जाहिर केला असून यामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पायाभूत सुविधा वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक सुधारणा सुरू असून त्याचा थेट फायदा महाराष्ट्राला होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारतीय रेल्वेसाठी सुमारे 2.78 लाख कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. तसेच 2025-26 दरम्यान 71 हजार विशेष गाड्या चालवून लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे आल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी देशभरातील 75 स्थानकांवर होल्डिंग एरिया उभारले जात आहेत.

याशिवाय सुमारे 60 हजार कोटींच्या अनुदानामुळे प्रवाशांना सरासरी 45 टक्के सवलतीत प्रवास करता येत असून रेल्वे हे जगातील सर्वात परवडणाऱ्या वाहतूक साधनांपैकी एक ठरत आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत देशातील 1300 स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे. यापैकी 180 स्थानकांचे पूर्ण झाले आऊन 500 स्थानकांचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.

महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 3000 कोटींचे अनुदान दिले जात असून यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास परवडणारा झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईमध्ये 238 नवीन स्वयंचलित दरवाजे (Automatic Doar) असलेल्या लोकल गाड्या तयार केल्या जात आहेत. तसेच मुंबई आणि पुणे यांसह 48 शहरांमध्ये रेल्वे क्षमतेत वाढ करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म, टर्मिनल्स आणि पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

मुंबई ते पुणे फक्त 48 मिनिटांत

देशात 7 बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू असून Mumbai-pune-bullet train मार्गामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या 48 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. तसेच Pune-Hyderabad Bullet Train प्रकल्पामुळे हा प्रवास सुमारे 2 तासांत पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक कुंभमेळासाठी मास्टर प्लॅन

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे स्थानकांसाठी मास्टर प्लॅन करण्यातर आला आहे. या अंतर्गत 17 नवीन रोड ओव्हर ब्रिज आणि 19 भुयारी मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Ambenali Ghat Closed: आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते? VIDEO

Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस; जाणून घ्या एका दिवसाचं भाडं

SCROLL FOR NEXT