Maharashtra Politics: SAAM TV
महाराष्ट्र

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Maharashtra Politics: हरियाणा आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडी बहुमताने जिंकत आहे. महाराष्ट्रात दोनशेचा टप्पा पार करून असंविधानिक सरकार पार पडेल," असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर

'पंतप्रधान मोदींच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पर्धेचा प्रवास सुरू झाला होता. चंद्राबाब आणि नितीश कुमार कुबड्या घेऊन सत्तेत यावर लागलं. पण चार राज्यात आल्यावर यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे,' असे म्हणत काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील एनडीएसह, महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. नागपुरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"राहुल गांधींची यात्रा देशभरात गाजली. देशातील विषमता दूर करण्याचा काम राहुल गांधी यांनी केले. सर्व - जाती धर्मात समानता यावी, जाती जातीत विष घालवण्याचे काम सुरू होता त्याला आता जनता संतापली आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा निकाल आम्हाला अपेक्षित होता. मोदींच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पर्धेचा प्रवास सुरू झाला होता. चार राज्यात आल्यावर यांना खुर्ची खाली करावी लागणार आहे. हरियाणा आणि काश्मीर याने दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडी बहुमताने जिंकत आहे. महाराष्ट्रात दोनशेचा टप्पा पार करून असंविधानिक सरकार पार पडेल," असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

"रॅम्प तयार करून मोठमोठे इव्हेंट लाडके बहिणीच्या माध्यमातून सादर करत आहे. गाडीत बसा नाहीतर दीड हजार मिळणार नाही. लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात गर्दी करून इव्हेंट करण्याचं काम करत आहे. चेंगराचेंगरी होत आहे, बहिणीच्या एका पिशवी टाकायचे आणि दुसऱ्या पिशवीतून काढून घेण्याचा काम सरकार करत आहे," असे म्हणत लाडकी बहीण योजनेवरुनही विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला खडेबोल सुनावले.

"सत्तेत बसून गांधी आणि नेहरूला जबाबदार धरत असाल तर तुम्ही सत्तेत कशाला बसला सरकारी पैशातून मेजवानी कशाला मारत आहे. बोट काँग्रेसला दाखवायचे हे कशासाठी. सोयाबीनला हमीभापेक्षा कमी भाव मिळत असेल तर पंतप्रधान बोलताना या नतंभ्रष्टाचार लोकांकडून माहिती घ्यावी.काँग्रेसने मेट्रोला मंजुरी दिली होती मात्र आता सत्ता गेली. ते स्वतःचा अपयश झाकण्याचा काम करत आहे," असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुनही विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT