harshwardhan Patil|Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Indapur Politics: इंदापुरात राजकारण तापलं! मित्रपक्षांकडून तालुक्यात फिरू न देण्याची धमकी; हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे- फडणवीसांना पत्र

Indapur Politics: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी यासंबंधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे |ता. ४ मार्च २०२४

harshwardhan Patil Letter:

लोकसभा निवडणुका जशजशा जवळ येतील तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीसह, महायुतीमध्ये जागा वाटपांवरुन मित्रपक्षांमध्येच वाद रंगत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी यासंबंधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणालेत हर्षवर्धन पाटील?

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत.

त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती, असे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, इंदापूर तालुक्यात अजित पवार गट (Ajit Pawar) आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये संघर्ष आहे. अजित पवार विधानसभेसाठी मदत करणार असतील तरच लोकसभेचे काम करु, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी थेट अजित पवारांवर टीका केली होती. अशातच हर्षवर्धन पाटील यांनी मित्रपक्षांवर हे गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT