Heat Wave
Heat Wave Saam Tv
महाराष्ट्र

तापमानात वाढ; परभणीकरांची जीवाची काहिली...

राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: गेल्या तीन दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. काल परभणीचे तापमान 42.2अंश डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचले होते. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून ज्यामुळे नागरिकांना जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांच्या (Parbhani) जीवाची काहिली होत आहे. उष्णतेची लाट (Heat Wave) पुढील दोन दिवसांत तापमानाचा पारा 45ते 46 डिग्री सेल्सिअस पर्यत जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोरोनाच्या (Corona) दोन वर्षाच्या काळात उद्योग धंदे बंद होते नागरिकानी गेली दोन उन्हाळे घरी बसून काढले. आता उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत पण प्रचंड तापमानामुळे नागरिक सकाळी अकरा वाजल्यानंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. तर दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

हे देखील पहा-

शहरात बाजारहटासाठी येणारी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. दुसरीकडे प्रचंड तापमानामुळे ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. बाजारात थंड पेयाचि मागणी वाढली आहे तर घरात राहावे तर भारनियमन व सतत जाणाऱ्या विजेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding collapse : मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको, पत्नीला केलेला कॉल ठरला शेवटचा; ठाण्यातल्या कुटुंबाचा आधारच हिरावला!

Today's Marathi News Live : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलली

Nagpur Crime : दुकान चालवण्यासाठी मागितली खंडणी; तिघांना बर्डी पोलिसांकडून अटक

KL Rahul: संजीव गोयंका अन् केएल राहुलच्या भेटीचा तो फोटो व्हायरल! भेटीत नेमकं काय घडलं?

Asmita Deshmukh : देवमाणूसमधील डिंपल सध्या काय करतेय?

SCROLL FOR NEXT